RUDRAMANI*रुद्रमणी*
- हंगाम : उशिरा खरीप (रांगडा) आणि रब्बी/ उन्हाळी उत्तम.
- वाणाची वैशिष्ट्ये : घट्ट, आकर्षक गुलाबी लाल रंगाचा गड्डा (भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे यांचे नवीन संशोधित वाण)
- उत्पादन क्षमता : २४० ते ३०० क्विंटल/ एकर)
- साठवण क्षमता : ५ ते ६ महिने
- वाण : भीमाशक्ती
* Brand Name * ब्रँड नाव
Talk to usसंपर्क करा
Advanced management guide for Rudramani रुद्रमणीसाठी प्रगत व्यवस्थापन मार्गदर्शक
The full field handbook — climate, soil, nutrients, irrigation, harvest, storage, and Issues — in English and Marathi. संपूर्ण शेत मार्गदर्शक — हवामान, जमीन, खत, पाणी, काढणी, साठवण आणि अडचणी — इंग्रजी व मराठीत.
1) Climate & temperature requirements १) हवामान व तापमान
| Crop growth stageपीक वाढीचा टप्पा | Required climateआवश्यक हवामान | Ideal temperatureयोग्य तापमान | Scientific effectशास्त्रीय परिणाम |
|---|---|---|---|
| Vegetative growth (initial phase)शाकीय वाढ (सुरुवातीचा काळ) | Cool with moderate humidityथंड आणि मध्यम आर्द्रता | 15°C to 25°C१५°सें. ते २५° सें. | Promotes proper leaf count and neck diameter growth.पानांची संख्या व खोडाचा घेर व्यवस्थित वाढतो. |
| Bulb developmentगड्डा पोसण्याचा काळ | Hot, dry, with high sunlightउष्ण, कोरडे व जास्त सूर्यप्रकाश | 20°C to 30°C२०° सें. ते ३०° सें. | Photosynthates (food nutrients) are stored directly into the bulb.प्रकाश संश्लेषणातून अन्नद्रव्ये गड्ड्यात साठवली जातात. |
Note: If the temperature exceeds 35°C during bulb development, the onion matures prematurely, resulting in smaller bulb size or thick necks. टीप: गड्डा पोसताना तापमान ३५°सें. पेक्षा जास्त झाल्यास कांदा मुदतपूर्व परिपक्व होऊन गड्ड्याचा आकार लहान राहतो किंवा मान जाड होते.
2) Seed, soil, tillage, nursery & transplanting २) बियाणे, जमीन, मशागत, रोपवाटिका, पुनर्लागवड
बियाण्याचे प्रमाण: ३ ते ४ किलो प्रति एकर (हेक्टरी ७.५ ते १० किलो).
जमीनीची निवड: मध्यम ते भारी, सेंद्रिय कर्ब चांगला असलेली व सुयोग्य निचऱ्याची.
पूर्व मशागत: एक खोलगट नांगरट देऊन गुळव्याच्या उभ्या आडव्या दोन पाळ्या द्याव्यात.
रोपवाटिका बियाण्याचे प्रमाण: १ ते १.२ किलो बियाण्यासाठी ३ गुंठे (३०० चौ.मी.)
रोपवाटिका तयारी: नर्सरी वाफा खोल नांगरून, ढेकळे फोडून, शेवटच्या नांगरणीवेळी ५-६ गुंठे क्षेत्रासाठी ५०० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि १.२५ किलो ट्रायकोडर्मा मिसळावे. गादी वाफा १५ सें.मी. उंचीचे आणि १.२ मीटर रुंदीचे वाफा ड्रिप किंवा स्प्रिंकलर पाणीसह तयार करावेत, किंवा पाणी उपलब्ध नसल्यास १.०-१.२ मीटर रुंदीचे व ५-६ मीटर लांबीचे वाफा तयार करावेत.
पुणर्लागवड: ४० ते ४५ दिवस.
लागवडीचे अंतर: १५ सें.मी. (ओळीत) × १० सें.मी. (रोपांत).
3) Nutrient & fertilizer management ३) अन्नद्रव्य व खत व्यवस्थापन
Recommended chemical fertilizer dose is 100:50:50 kg NPK per hectare (40:20:20 kg per acre). कांदा पिकासाठी शिफारस केलेली रासायनिक खतमात्रा १००:५०:५० किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टर (अर्थात ४०:२०:२० किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति एकर) आहे.
A) Organic & bio-fertilizersअ) सेंद्रिय व जिवाणू खते
शेणखत/ कंपोस्ट: २५ ते ३० टन/ हेक्टर (१० ते १२ टन/ एकर) लागवडीपूर्वी १५ दिवस आधी मातीत मिसळावे.
जिवाणू संवर्धक: अझोस्पिरिलम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
B) Chemical fertilizer doseब) रासायनिक खतमात्रा
| Timingवेळ | Fertilizer option (per acre)रासायनिक खत पर्याय (प्रति एकरी) | Key nutrientमुख्य घटक |
|---|---|---|
| At transplantingलागवडीच्यावेळी | १ बॅग युरिया + २.५ बॅग सिंगल सुपर फॉस्फेट + ०.५ बॅग म्युरेट ऑफ पोटॅश | नत्र (५०%), सर्व स्फुरद व पालाश |
| At 30 days३० दिवसांनी | ०.५ बॅग युरिया | नत्र (२५%) |
| At 45 days४५ दिवसांनी | ०.५ बॅग युरिया | नत्र (२५%) |
C) Micronutrients (very important)क) सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये (अत्यंत महत्त्वाचे)
गंधक: हेक्टरी ४५ किलो (एकरी १८ ते २० किलो) गंधक लागवडीच्या १५ दिवस आधी मातीत मिसळावे. (गंधकामुळे कांद्याचा तिखटपणा आणि साठवण क्षमता वाढते).
सिलिकॉन: कांदा पिकाच्या अधिक व गुणवत्ता युक्त उत्पादनासाठी व कीड रोगाचाव प्रादुर्भाव टाळण्याकरिता पुनर्लागवडीनंतर २०, ४० व ६० दिवसांनी २ मि.ली. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
सूक्ष्म अन्नद्रव्ये: लागवडीनंतर ३५ व ४५ दिवसांनी मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड-२ (फवारणीसाठी) ३० ते ४० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून द्यावे.
4) Weed, disease & pest management ४) तण, रोग व किड व्यवस्थापन
तण व्यवस्थापन: लागवडी अगोदर बासालीन (फ्लुक्लोरालिन) २.५ मिली प्रती लिटर पाण्यातून जमिनीवर फवारणी करावी लागवडीनंतर २१ ते २५ दिवसांनी ऑक्झिप्ल्युरोफेन (गोल) २३.५% ईसी १० मिली प्रति १० लिटर किंवा टरगा सुपर १५ मिली व ऑक्झिप्ल्युरोफेन (गोल) १० मिली प्रती १० लिटर पाण्यातुन फवारणी करावी वरील तणनाशकाची फवारणी केल्यास ४०-५० दिवसापर्यंत शेत तण विरहीत राहते व नंतर एक खुरपणी द्यावी म्हणजे तणाची वाढ नियंत्रित राहुन उत्पादनात वाढ होते.
रोग व किड व्यवस्थापन (तुडतुडे, मावा, थ्रीप्स, जांभळा करपा आणि तपकिरी करपा): फुलकिडे पिले आणि प्रौढ पाने खरवडतात आणि त्यातून बाहेर येणारा रस शोषतात. त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात यालाच टाक्या असे संबोधतात. त्याच्या नियंत्रणासाठी टोलफेनपायरॅड १५% ई.सी.२ मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन ११% ई.सी. ३ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी. १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने या किटकनाशकांच्या आलटुन पालटून फवारण्या कराव्यात. अधून मधून ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. फवारणी करतांना चिकट द्रव्याचा (०.१%) वापर जरूर करावा. करपा रोग डायफेनकोनॅझोल २५% ई.सी.१० मि.ली. १० लिटर पाण्यात किंवा टेब्युकोनॅझोल २५.९% ई.सी. १० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात किंवा अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२% + डायफ्फ्रेनोकोनॅझोल ११.४% एससी १० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात किंवा अॅझोक्सिस्ट्रोबीन ११% + टेब्युकोनॅझोल १८.३% १० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात किंवा किटाझिन ४८% इ.सी. १० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यातून १० दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावेत. (किटकनाशक व बुरशीनाशकाचे प्रमाण १० लि. पाण्यासाठी दिले आहे.)
5) Irrigation management ५) पाणी व्यवस्थापन
Water management should be adjusted based on soil type, climate and growth stage. जमिनीचा प्रकार, हवामान आणि वाढीच्या टप्प्यानुसार पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक असते.
| Growth stageवाढीचा टप्पा | Irrigation timingपाणी देण्याची वेळ / कालावधी | Intervalसिंचनाचे अंतर | Important notesमहत्त्वाच्या सूचना |
|---|---|---|---|
| At transplantingपुनर्लागवडीच्या वेळी | १ ले पाणी (हलके पाणी) | लागवडीच्या दिवशी | रोपांची मुळे जमिनीत धरण्यासाठी लगेच पाणी द्यावे. |
| After transplantingलागवडीनंतरचा काळ | २ रे पाणी (आंबवणी) | लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांनी | रोपे सेट होण्यासाठी हलके पाणी देणे आवश्यक असते. |
| Vegetative growthशाकीय वाढीचा काळ | लागवडीपासून ३० ते ३५ दिवसांपर्यंत | दर ७ ते ८ दिवसांनी | या काळात जमिनीतील ओलावा टिकून राहिल्याने पानांची व रोपांची भक्कम वाढ होते. |
| Bulb bulkingकांदा फुगण्याचा काळ (मान व गड्डा बनणे) | लागवडीनंतर ४० ते ८०/९० दिवसांपर्यंत | दर १० ते १२ दिवसांनी | हा कांदा पोसण्याचा मुख्य काळ आहे. या काळात ताण बसू देऊ नये. |
| Pre-harvestकाढणीपूर्व काळ | ९० दिवसांनंतर ते काढणीपर्यंत | दर १२ ते १५ दिवसांनी | कांद्याची मान पडून कांदा पक्व होण्याच्या काळात पाण्याचे प्रमाण कमी करावे. |
Note: Apply light irrigation; avoid waterlogging. Drip or sprinkler saves 30–40% water. Stop irrigation 15–20 days before harvest. टीप: पाणी नेहमी हलके द्यावे; शेतात पाणी साचून राहू देऊ नये, अन्यथा मूळकूज किंवा मानकूज रोगाचा प्रादुर्भाव होतो. ठिबक किंवा तुषार (Sprikler) सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची ३० ते ४०% बचत होते आणि पिकाची वाढ एकसारखी होते. काढणीपूर्वी १५ ते २० दिवस आधी पाणी पूर्णपणे बंद करावे.
6) Harvesting & storage ६) काढणी व साठवण
काढणीची वेळ: पुनर्लागवडीनंतर १२० ते १३० दिवसांनी (५०% कांद्याची मान मोडल्यावर) काढणी करावी. कांदा पक्व झाला म्हणजे नवीन पाने येण्याचे थांबते, पातीतील अन्नरस कांद्यात उतरून कांदा वजनदार होऊ लागतो, कांद्याची पात पिवळसर होते, व पातीचा जाडसर भाग मऊ पडून पात कोलमडते यालाच माना मोडणे म्हणतात. कांद्याच्या बुडाशी घट्ट असलेली मुळे सुकून जमिनीची पकड सैल पडते, ३०-४० टक्के माना पडल्या म्हणजे कांदा काढावा. शेतात कांदा सुकविल्यानंतर ३-४ सें. मी. मानेचा भाग पिळून पात कापावी म्हणजे कांद्याला साठवणीत मोड येत नाही.
साठवणुक: काढणीनंतर कांदा ३ ते ४ दिवस पाला झाकून शेतात व नंतर १० ते १२ दिवस सावलीत चांगला सुकवून मगच साठवणुकीत ठेवावा.
7) Issues (bolting & yellowing) ७) अडचणी (डेंगळे येणे व पाने पिवळी पडणे)
A) Scientific reasons for boltingअ) कांद्यामध्ये डेंगळे येण्याची शास्त्रीय कारणे
कांद्यामध्ये बियांचे डेंगळे येणे ही वनस्पतीची प्रजनन टप्प्यातील असमयी वाढ असते. याची मुख्य शास्त्रीय कारणे खालील प्रामाणे;
तापमानातील अचानक घट: रोपांच्या सुरुवातीच्या काळात प्रदीर्घ काळ तापमान १०° सें. ते १५° सें. पेक्षा कमी राहिल्यास संप्रेरकांच्या बदलामुळे पीक शाकीय वाढ सोडून थेट बी निर्मितीकडे (प्रजननाकडे) वळते.
अतिवयाच्या रोपांची लागवड: ४५-५० दिवसांपेक्षा जास्त वयाची किंवा ०.८ सें.मी. (८ मिमी) पेक्षा जास्त जाड खोड असलेली रोपे वापरल्यास त्यातील 'सिट्युवेशनल सिग्नल्स'मुळे डेंगळे येण्याचे प्रमाण ८०% पर्यंत वाढते.
असंतुलित नत्र व्यवस्थापन: सुरुवातीला नत्राचा अतिवापर आणि नंतर गड्डा फुगण्याच्या काळात नत्राची अचानक कमतरता किंवा पाण्याचा ताण बसल्यास वनस्पती ताणात येऊन डांगर फेकते.
हंगामाव्यतिरिक्त लागवड: रांगडा/ रब्बीचे वाण योग्य वेळेपेक्षा उशिरा किंवा चुकीच्या हंगामात लावल्यास फोटोपिरियड (प्रकाश कालावधी) बदलावामुळे बोल्टिंग होते.
B) Leaf discoloration & yellowingब) पानांचा रंग बदलणे व पिवळेपणा येण्याची शास्त्रीय कारणे
पाने पिवळी किंवा काळी पडणे हे थेट बोल्टिंगशी संबंधित नसून अन्नद्रव्यांची कमतरता किंवा जैविक/ अजैविक ताणामुळे होते;
नत्र कमतरता: जुनी (खालची) पाने आधी पिवळी पडतात आणि संपूर्ण झाडाची वाढ खुंटते.
गंधक कमतरता: नवीन (वरची) पाने पिवळी पडतात (गंधक वनस्पतीमध्ये फिरत नाही).
पालाश कमतरता: पानांची टोके जळाल्यासारखी होऊन तपकिरी पडतात.
पाण्याचा किंवा क्षारांचा ताण: जमिनीची क्षारता जास्त असल्यास किंवा मुळांना प्राणवायू कमी पडल्यास (दलदल) पानांची टोके सुकतात.
बुरशीजन्य रोग (करपा): करपाच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पांढरे/ करडे ठिपके पडतात आणि नंतर अल्टरनेरिया बुरशीमुळे पाने काळी/ करडी पडून सुकतात.
Any field work such as spraying, fertilizers, or irrigation should not be done without expert advice. फवारणी, खते देणे किंवा सिंचन (पाणी देणे) यासारखी कोणतीही शेतातील कामे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नयेत.